27.7.10

भेट तुझी माझी स्मरते

_______________________________

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
_______________

गीतकार: मंगेश पाडगांवकर
गायक: अरुण दाते
संगीतकार: यशवंत देव

16 comments:

  1. यशवंत देव झिंदाबाद.

    ReplyDelete
  2. Maastach Abhi....sumadhurr gana

    ReplyDelete
  3. Kaay kavita rachali aahe, kaay sangeet aahe ani kaay sundar gayale aahe. Great- all time great.

    ReplyDelete
  4. beautiful memory lane, thanx Abhi

    ReplyDelete
  5. wah! kya bat hai! sundar gane! dhanayavad!

    ReplyDelete
  6. naadach khula..!!

    ReplyDelete
  7. अरे यार हि रेकोर्ड होती घरी. . पण आता ते रेकोर्ड प्लेयर औट डेटेड झाल्यामुळे हे गाणेच विसरलो होतो . . बरे झाले आठवण करून दिलीत. . .

    ReplyDelete
  8. He gane khupach chan aahe. Junya aathavni jagya zalya. Tks Pushkar.

    ReplyDelete
  9. khup chhaan aani sundar

    ReplyDelete
  10. Hey Sameer Deodhar . . Thanks to Abhijeet Dalvi. . . Not to me Dear

    ReplyDelete
  11. ट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ...... ....pratyek shabd....manala bhidnara

    ReplyDelete