12.7.10

अवेळीच केव्हा दाटला अंधार

__________________________

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिच्या गळा जड झाले काळे सर
एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कळून गेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या कासोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिटीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांची पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साउली
त्या डोळियात जरा मी पाहिले
काजळात चंद्र पुडून गेले
__________________________


गीत : ना. धो. महानोर
संगीत व स्वर : श्रीधर फडके


16 comments:

  1. Aprateeeeeeeeeeeeem Abhi..thanks..

    ReplyDelete
  2. Boss...Kharach..... Khup Mast

    ReplyDelete
  3. मस्तच...खूपच छान ! अभिजीत!

    ReplyDelete
  4. khup divsanni hi gani aikali, sundar!

    ReplyDelete
  5. '' shri ''
    Abhijitrao ... Thanx for the songs and video ...
    rgds

    ReplyDelete
  6. a very nice song well composed and sung with beautiful vdo...i like it
    thanks....

    ReplyDelete
  7. lovely....the more u listen more u get absorb in every word n the nature........the voice is so soothing n eternal....

    ReplyDelete
  8. Singer, album, sounded like Hrishikesh Ranade anyone ?

    ReplyDelete
  9. abhijit kiti kiti sundar ahe he gane!!! album che nav kalavshil please!!!

    ReplyDelete
  10. "काही बोलायाचे आहे" आल्बम ९० च्या दशकात रिलीझ झाली होती....

    ReplyDelete
  11. thanks so much will search for it!!! keep it up! i will be waiting for more songs like this

    ReplyDelete
  12. श्रीधरच्या आवाजात एक आर्तता आहे..भावनांना स्पर्श करण्याचे समर्य्थ त्यच्या गायकीत आहे..

    ReplyDelete