31.10.10

अनंता तुला कोण पाहु शके

________________
अनंता तुला कोण पाहु शके
तुला गातसा वेद झाले मुके
मतीमंद अंधा कसा तू दिसे
तुझी रूप तृष्णा मनाला असे

तुझा ठाव कोठे कळेना तरी
गमे माणसा चारूरी माधुरी
तरु वाल्लरीना भूली मी पुसे
तुम्हा निर्मिता देव कोठे वसे

फुले सृष्टीची मानसा राजिती
घरी सोयरी गुंगविती मती
सुखे भिन्नही येथे प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू साके

तुझे विश्व ब्रम्हान्डही नि:स्तुला
कृती गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषु शके

नवी भावपुष्पे तुला वाहिली
तशी आर्पीली भक्ति बाष्पाजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू कल्पना जल्पना त्या हरो
_____________

गीत : बाकीबाब बोरकर
स्वर/संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी

46 comments:

  1. hmm...pandit jidendra abhisheki.........its one of maestros masterpeice.!

    ReplyDelete
  2. sarvatmaka is the best!

    ReplyDelete
  3. मतीमंद अंधा कसा तू दिसे

    ReplyDelete
  4. अभिजित अप्रतिम भेट हं! अभिषेकी बुवांची अप्रतिम चाल ! आणि बाकीबाब चे शब्द भावासकट पोचवण्याचा त्यांचा केवढा ध्यास ! सगळंच अवर्णनीय ! त्या निराकार निर्गुण ईश्वराचे वर्णन करताना वेद हि नेति...नेती म्हणतात तिथे कवीला पडलेला संभ्रम काय वर्णावा !माधुर्य आणि प्रासादिक शब्दांची रांगोळीच घातलीय बोरकरांनी अनंताभोवती ! ज्ञानेश्वर कबीर टागोर यांचा स्पर्श लाभलेले तरीही स्वयंभू काव्य आहे !

    ReplyDelete
  5. बाकी बाबच उरलेली नाही ह्यावर बोलायला कारण बाकीबाबजींच्या अप्रतिम काव्यावर बुवांच्या तितक्याच ताकदीचा "अभिषेक" मग काय...... आम्हाला हा दुग्धशर्करा योग पाहाण्याचा आणि ऐकण्याचा अनुभव तुझ्यामुळे मिळाला त्याबद्दल तुझे मनःपुर्वक आभार अभिजीत.......

    ReplyDelete
  6. Nandu dada agdi hrudaysparshi..... agdi tallin howun gele mi tyat.. shabdpurn...

    ReplyDelete
  7. Shabdat wyakt karayala shakya nahi. Apratim

    ReplyDelete
  8. An excellent choice of song ...best sound quality & ofcourse video..
    Its impossible to see god almighty but his existence is everywhere ...it can only be felt...

    ReplyDelete
  9. maze atishaya avadte gane...dhanyawad...

    ReplyDelete
  10. नवी भावपुष्पे तुला वाहिली - तशी आर्पीली भक्ति बाष्पाजली - तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो - प्रभू कल्पना जल्पना त्या हरो --- अभी, तुझ्यामुळे बोरकरांचं सुंदर काव्य ऐकायला मिळाल. पुनःश्च आभार.

    ReplyDelete
  11. अतिशय सुंदर....सुरेख शब्द रचना व त्यावरचा अभिषेकींचा स्वर-साज,निराकार रूपी त्या परमेश्वराचे गुणगान,त्याचा अंतरंगातून शोध,ती त्याला पाहण्याची आसक्ती,ती तहान....अतिशय रमणीय,निशब्द करणारी मेजवानी..thanks abhijeet..

    ReplyDelete
  12. अप्रतिम !

    ReplyDelete
  13. shabdachi jadoooooooooooooooooooo

    ReplyDelete
  14. ati sunder..............

    ReplyDelete
  15. खूप सुंदर

    ReplyDelete
  16. unleveled. simply bliss.

    ReplyDelete
  17. Khup Chan!!!!!!!!!...........

    ReplyDelete
  18. this is visualization of that real ANANT

    ReplyDelete
  19. ही दिवालीच्या हार्दिक शुभेछा हे दिवाली आपल्याला सुख समृधिची जाओ ही ईश्वर चरनी प्रार्थना

    ReplyDelete
  20. Jabardast kavya bhardast awaj

    ReplyDelete
  21. अभी कसली सही निर्मिती आहे..........ग्रेट..पंडितजीना एकल्यावर स्वर्ग सुख काय असते ते कळले......इन्हें सुनने के लिए सौ बार मरना मंजुर जिऐंगे इन्हे सुनने के लिए और मरेंगे भी इनकी सुरों की जादू के लिए....

    ReplyDelete
  22. अतिशय अप्रतिम काव्य आणि तितकेच कर्णमधुर ताकदवर संगीत, आर्त स्वर - खरेच अभिजित, तुमच्यामुळे इतका छान कलाविष्कार अनुभवायला मिळाला. किती धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.

    ReplyDelete
  23. thank u very much for requested tag...

    ReplyDelete
  24. मतीमंद अंधा कसा तू दिसे
    तुझी रूप तृष्णा मनाला असे
    अप्रतिम काव्य-स्वर-संगित!

    ReplyDelete
  25. Ramesh Bhagvangt VeluskarJune 6, 2011 at 3:15:00 PM GMT+5:30

    बा.भ.बोरकरांच्या स्वरांना जीतेन्द्रानी स्पर्श केला आणि एक सुंदर सामसंवेदना निर्माण केली. या साम स्वर संवेदनेला स्पर्श करणारी सारीच मने सुंदर आसतात.

    ReplyDelete
  26. Jitendra Abhisheki..... swarancha akhand abhishek.....

    ReplyDelete
  27. Great poetry,great music and a great vocalist.Bua, was a supreme artist, the like of him we will not see for a long long time to come.

    ReplyDelete
  28. Satguru tu beyant hai! Teri koyee vyakya nahee kee ja sakti!

    ReplyDelete
  29. शब्द ..स्वर.........आणि सार्थ प्रेझेंटेशन ...........अप्रतिम अभी .......:)))))))

    ReplyDelete