18.11.10

मी ओळखून आहे

_____________________
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे

डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन का चंद्र हि दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्यांच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दु:ख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथें दिवाणे

जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातूनी फुलांच्या आणि सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे
_____________

गीत : मंगेश पाडगांवकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : पंडित हृदयनाथ मंगेशकर

49 comments:

  1. हे पाडगावकरांचे सुरुवातीचे गाणे आहे .या संपूर्ण गीतावर बाकीबाब चा प्रभाव जाणवतो .खास करून अतिशय शृंगारिक आणि खूप सुंदर गीत स्वर आणि संगीत ! छायाचित्रण अप्रतिम !पाडगावकरांनी ला ....जून वर तिरकस टिप्पणी केली होती .पण गाणे खरच हृदयनाथांनी हळुवारपणे म्हटले आहे .मनावर रुंजी घालते...

    ReplyDelete
  2. again the great BAKIBAV

    ReplyDelete
  3. अर्थात बोरकरांच्या कवितेचा प्रभाव पाडगावकरही मान्य करतातच ....

    ReplyDelete
  4. साजिद शेख superbbb !!!!

    ReplyDelete
  5. Ahaa !! graphics beyond expectations..my dream..m so happy. ♥♥♥♥♥ !!..thanks Abhi !!!!!!

    ReplyDelete
  6. kharach khoop sunder gane ahe.

    ReplyDelete
  7. @ST हे मी पूर्वी वाचलं नव्हतं. बोरकरांचा हा प्रभाव पाडगावकरांनी पुस्तकात किंवा मुलाखतीत सांगितला होता का? अशीच आणखी 1-2 गीतं आठवली तर जरूर पोस्ट कराल का? इतकं काही लिहिलय त्यानी की किती स्रोत आणि कुठून कुठून आले असणार..

    ReplyDelete
  8. खरंच आता असे हळुवार रोम्यांटिक होणे कोणाला जमतच नाही का?आताची गाणी कशी ढिंच्याक ढिंच्याकच असतात....

    ReplyDelete
  9. खुप छान गाणं....... पाडगावकरांचे नाजुक शब्द आणि पंडितजींचा तेवढाच हळुवार,सुरेल संगीत साज..... आणि रेश्मी,मुलायम स्वर...... आल्हाद दायक अनुभव.....

    ReplyDelete
  10. please chukichi mahiti deu naka....gayak Pt Hridaynath ahet matra music Shree niwas Khale yanche ahe...please take a note and change also.

    ReplyDelete
  11. tumhi upload keleli saglich gani , gazals far sundar astat.......selection chan aahe........

    ReplyDelete
  12. Fresh start of the Day !!

    ReplyDelete
  13. मधुर मुलायम शब्द, सूर ,संगीत यांचा मिलाप त्याला अप्रतिम व्हीडीओची साथ..धन्यवाद अभिजीत!

    ReplyDelete
  14. pharach surekh

    ReplyDelete
  15. Abhii...u hv made ma day..by posting this song..thx dilse..

    ReplyDelete
  16. One of the very beautiful and meanigful song, i have ever heard.
    it is more effective as it is sung by Pandit Hradaymathji

    ReplyDelete
  17. honestly....pratyek shabd hridayala sparsh karun jaato....thnx...

    ReplyDelete
  18. Hridayanathji ni gayala ahe nahanunach hridayala sparsh karoon jaato.nahi ka pavitra

    ReplyDelete
  19. NAMASKAR--ABHI-DAA--KHUUP CHHHAN GEET===MAZYA AVADNARYA GANANPAIKI 1--CHHANN..

    ReplyDelete
  20. my god..its difficult to read marathi............

    ReplyDelete
  21. Old song in a modern way i liked it.

    ReplyDelete
  22. Beautiful song i like this

    ReplyDelete
  23. abhijeet atshay sundr.ganyatle srv bhav atishay sundar tumacha aavajatun aaleaahet.

    ReplyDelete
  24. kharch khup chan kavita / gaane aahe.

    ReplyDelete
  25. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
    मिटताच पापण्या अन का चंद्र हि दिसावा ?
    ...हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे... Kya baat hai Suri aaj ek se ek gane

    ReplyDelete
  26. वाह !!!!!अप्रतिम गीत आहे .........

    ReplyDelete
  27. आणि ते गाताना प्रत्येक भाव जिवंत केलाय ......

    ReplyDelete
  28. Purohit So Romantic..कितीही वेळा ऐकली हि गाणी...तरी हि तृप्ती होत नाही..सुरेख शब्द रचना..अप्रतिम संगीत..आणि आवाज..अर्थात उत्तम चित्रीकरण....

    ReplyDelete
  29. softness in his voice conveys soooo much...so sweet...!!!

    ReplyDelete
  30. हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ...हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे .........मस्तच गाणे आहे ......

    ReplyDelete
  31. अभिजीत ...ह्यातील एक ओळ मला अत्यंत आवड्ते...
    हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणॆ..?????

    ReplyDelete
  32. Apratim bol...farach chan...Rahul...thnks.

    ReplyDelete
  33. तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथें दिवाणे.... हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणॆ.... देशातूनी फुलांच्या आणि सुगंध वारा
    रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे..... .मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे...

    ReplyDelete
  34. Golden era which still id going on

    ReplyDelete
  35. तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथें दिवाणे.... हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणॆ.... देशातूनी फुलांच्या आणि सुगंध वारा
    रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे..... अप्रतिम..अप्रतिम..........​..........................​.........मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे

    ReplyDelete