_____________________
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती
फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती
हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती
कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती
______________
गीतकार : मंगेश पाडगांवकर
गायक : सुधीर फडके
संगीतकार : यशवंत देव
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती
फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती
हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती
कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती
______________
गीतकार : मंगेश पाडगांवकर
गायक : सुधीर फडके
संगीतकार : यशवंत देव

बापू जी चा आणखी एक अति मधुर गीत ... खरच अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती......
ReplyDeleteअत्यंत सुंदर भावगीत आणि आवड पण ...
ReplyDeleteसर्वच कसे अप्रतीम..
EXTREMELY BEAUTIFUL/COLORFUL ANIMATION !! AFTER A LONG TIME GOT UR CREATIVITY..THANKS A LOT ABHI......
sharing it, i remember my childhood days, through these songs..
ReplyDeleteमंगेश पाडगांवकर is best in the last two lines. Ajun te sur gatat ani mag athavani gavasatat
ReplyDeleteदोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
ReplyDeleteफुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती बापुजींचे हे गीत माझे खूपच आवडते,आणि नेहमी गूण-गुणले जाणारे आहे! या गाण्याचे संगीत आणि शब्द सारे काही अप्रतिम आहे.
ReplyDeletekhup sunder gan ahe he abhijit ! mi ekda off chya send off la gayl hot !
ReplyDeleteशब्दरचना, संगीतरचना, स्वर, त्यातून व्यक्त होणारे भाव... सारं काही अप्रतिम! आम्ही भाग्यवान की असे कलाकार आम्हाला मिळाले!
ReplyDeletevideo is beautiful
ReplyDeletenice i liked it very much
ReplyDeleteअप्रतिम गाणे ! पाडगावकरांचे सुंदर शब्द ,देवांचे संगीत आणि बाबुजींचा आवाज जणू काही त्रिवेणी संगमच !
ReplyDeleteMTHNX FOR TAG SIR........NICE SONG ..MY FAMILY ENJOYED THE SONG.......
ReplyDeleteIs It a marathi Ghazal? will anybody pl enlighten!
ReplyDeleteyes.its in that format only
ReplyDeleteपाखरे ........kiti ...??? aaj kaal barich paakhare "CHIMANYA" diataayet sagalikade.......lol....pan he gaane massssttt ch...keep it up...
ReplyDeleteदेवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती....
ReplyDeletethanks ABHIJEET........!!!!!!
ReplyDelete