11.12.10

अशी पाखरे येती

_____________________
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती

हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती
______________

गीतकार : मंगेश पाडगांवकर
गायक : सुधीर फडके
संगीतकार : यशवंत देव

17 comments:

  1. बापू जी चा आणखी एक अति मधुर गीत ... खरच अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती......

    ReplyDelete
  2. अत्यंत सुंदर भावगीत आणि आवड पण ...
    सर्वच कसे अप्रतीम..
    EXTREMELY BEAUTIFUL/COLORFUL ANIMATION !! AFTER A LONG TIME GOT UR CREATIVITY..THANKS A LOT ABHI......

    ReplyDelete
  3. sharing it, i remember my childhood days, through these songs..

    ReplyDelete
  4. मंगेश पाडगांवकर is best in the last two lines. Ajun te sur gatat ani mag athavani gavasatat

    ReplyDelete
  5. लीना कुलकर्णीDecember 11, 2010 at 9:37:00 PM GMT+5:30

    दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती

    ReplyDelete
  6. फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती बापुजींचे हे गीत माझे खूपच आवडते,आणि नेहमी गूण-गुणले जाणारे आहे! या गाण्याचे संगीत आणि शब्द सारे काही अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  7. khup sunder gan ahe he abhijit ! mi ekda off chya send off la gayl hot !

    ReplyDelete
  8. शब्दरचना, संगीतरचना, स्वर, त्यातून व्यक्त होणारे भाव... सारं काही अप्रतिम! आम्ही भाग्यवान की असे कलाकार आम्हाला मिळाले!

    ReplyDelete
  9. nice i liked it very much

    ReplyDelete
  10. अप्रतिम गाणे ! पाडगावकरांचे सुंदर शब्द ,देवांचे संगीत आणि बाबुजींचा आवाज जणू काही त्रिवेणी संगमच !

    ReplyDelete
  11. MTHNX FOR TAG SIR........NICE SONG ..MY FAMILY ENJOYED THE SONG.......

    ReplyDelete
  12. Is It a marathi Ghazal? will anybody pl enlighten!

    ReplyDelete
  13. yes.its in that format only

    ReplyDelete
  14. पाखरे ........kiti ...??? aaj kaal barich paakhare "CHIMANYA" diataayet sagalikade.......lol....pan he gaane massssttt ch...keep it up...

    ReplyDelete
  15. देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती....

    ReplyDelete
  16. thanks ABHIJEET........!!!!!!

    ReplyDelete