26.10.10

तव नयनांचे दल हलले ग !


_______________

तव नयनांचे दल हलले ग !
पानावरच्या दवबिंदूपरी
त्रिभुवन हे डळमळले ग !

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरी ढासळले, सुर कोसळले
ऋषी, मुनी, योगी चळले ग !

ऋतुचाक्राचे आस उडाले
आभाळातुनी शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले ग !"

हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपी जग सावरले ग !
_______________

गीतकार : बाकीबाब बोरकर
स्वर : रविंद्र साठे
*स्वर/संगीत : सलील कुलकर्णी (originally)

42 comments:

  1. again....Great sir......thanks!!!

    ReplyDelete
  2. अभिजीत जी,
    माझे हे अतिशय आवडते गीत आहे !
    मी सुद्धा हे शेअर करीत आहे !
    तुमचे मनापासून धन्यवाद !!
    शुभ रात्री !!!

    ReplyDelete
  3. Apratim Bakibanchi kavita ani salil kulakarninche svar-sangeet! Dhanyavad! shubharatri! Abheejit!

    ReplyDelete
  4. Aprateem ,thank you Abhijit..........

    ReplyDelete
  5. Wonderful song...! Nice music, good voice, touchy lyrics !

    ReplyDelete
  6. meen jali talmale g,tribhuvan he dalmale g..

    ReplyDelete
  7. beautiful song, beautifully sung. I listened to this song with closed eyes and tried to imagine the object, action, sound, image that is suggested by each word of the song - that created a wonderful kaleidoscope of emotions - feel the thrill...

    ReplyDelete
  8. रविंद्र साठे यांनी या गाण्यात काही वेगळ्या हरकती घेऊन आणखीनच मजा आणली आहे.

    ReplyDelete
  9. Great song. Maja aali. Thanks for sharing.

    ReplyDelete
  10. प्रेम ही एक अनुभूती आहे.ती अनुभूती शब्दात सांगणे कठीण ..पण बाकीबाब सारखा प्रतिभाशाली कवी जेव्हा ते शब्दात नेमकं मांडतो तेव्हा चमत्कार होतो ! सर्वच कवींना हे साधत नाही तिथे फक्त काल्पनिक शब्दांचे बुड बुडे उठतात .एखादेच असे रसमय काव्य निर्मा...ण होते .ही कविता ऐकल्यावर मला नाही वाटत कुठलीही स्त्री स्वताला अबला म्हणून घेईल ?...किती आणि काय काय ती करू शकते पहा ! तिच्या पापण्या जराश्या काय लवल्या तर पानावरच्या दवाबिंदुसारखं अख्खं त्रिभुवन डळमळतं!....तारे गळून पडतात ..वाऱ्याची दिशा भरकटते ..दिग्गज अथी रथी नागासारखे झुलायला लागतात .ऋषी मुनी योगी सब टाय टाय फिस्स!..ऋतुचक्र बंध मुक्त होतं. आवरण्याची विनंती साक्षात ईश्वराला करावी लागते ...या सगळ्यापासून कविवर्य थोडेच वाचणार...जेव्हा ती खाली पाहू लागली तेव्हा कवीच्या ही हृदयात चकमक घडली इथेच बाकीबाब वेगळे ठरतात !कारण हृदयात चकमक होऊनही ते क्षणात सावरतात ..क्या बात है! ....

    ReplyDelete
  11. Dhanyawaad.. Song was beautiful and Picturized perfectly

    ReplyDelete
  12. khup sunder kavita.....Apratim composition....!!! Borkaranchi kavita mhanje ek rudaysparshi ghatnach aste...

    ReplyDelete
  13. धन्यवाद अभीजीतजी

    ReplyDelete
  14. kavita sunder, gaane sunder and picturization ati sunder..

    ReplyDelete
  15. COOL..NICE...VERY VERY GOOD..KEEP IT UP..

    ReplyDelete
  16. far sundar gane ahe salil kulkarni ne far chhan gayle ahe very expressive voice.

    ReplyDelete
  17. aah ha !!!!!!!!!!!! abhi re kitti sundar aahe he gaane

    ReplyDelete
  18. borkar babwill be there for so many years. congrats to all. Abjith, ravindra sade, salil kulkarni. As borkar bab all will be blessed.

    ReplyDelete
  19. amar geet...... thanks to saleel too

    ReplyDelete
  20. Lovlyyyyyyyyyyyyyyyyyyyyy

    ReplyDelete
  21. AMAZING ,FABULOUSSONG.. THKS SHALMALI JI...

    ReplyDelete
  22. atyant surekh......

    ReplyDelete
  23. हेच गाणे सुनीताबाई देशपांडे ही सुंदर सादर करीत .

    ReplyDelete
  24. atishay sunder gane.

    ReplyDelete
  25. nice sir ... very nice.............................

    ReplyDelete
  26. Hi Soor kharach koslatat! Dr Salil Kulkarni is expert in that and each soor catches u at right moment .Thanks Abhijit

    ReplyDelete
  27. झक्कास काव्य!
    खूप पूर्वी दूरदर्शन वरील एका कार्यक्रमात
    बाकीबाब बोरकरांच्या तोंडून हि कविता प्रथम ऐकली होती
    तेंव्हा पासून खूप आवडती कविता होती हि.
    व आता ती गीत म्हणून ऐकताना आणखीन मस्त वाटते.
    ...
    हे नयनांचे दल हलू लागले कि हृदयी देखील हलू लागते.
    अप्रतिम.
    धन्यवाद व्रीशालीजी.

    ReplyDelete
  28. anakhin nahi ka kahi?

    ReplyDelete
  29. Vसुंदर !..गायक कोण आहेत ?

    ReplyDelete
  30. गीतकार : बाकीबाब बोरकर
    स्वर : रविंद्र साठे
    *स्वर/संगीत : सलील कुलकर्णी (originally)

    ReplyDelete
  31. Just Beautiful.........luv ur work

    ReplyDelete
  32. अभिजीत तुला किती वेळा धन्यवाद देउ!!!हे गाणे फक्त सलीलदांनीच गावे!!!

    ReplyDelete
  33. WAH..WAH... ! KYA BAAT HAI ,JIYO.. JIYO.

    ReplyDelete