वार्‍याने हलते रान


_____________


वार्‍याने हलते रान
तुझे सूनसान
हृदय गहिवरले
गायीचे डोळे करून उभे कि
सांज निळाईतले

डोळ्यात शीण
हातात  वीण
देहात फुलाच्या वेगी
अंधार चुकवा म्हणून
निघे बैरागी

वाळूत पाय
सजतेस काय
लातंध समुद्र काठी
चरणतला हरवला गंध
तीझुं कि ओठी ?

शून्यात गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी
वृक्षात तिथीचा चांद
तुझा कि वैरी
_______________

गीत : ग्रेस
संगीत :  पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर :  पं. हृदयनाथ मंगेशकर

सुचवाल का ह्या कोकिळा ?

______________


कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाउ नका, खुलवू नको आपुला गळा

आधीच संध्याकाळचा बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
फार पूर्वीच दिला तो श्वास साहून वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला

सांभाळुनी माझ्या जिवाला मी जारासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी नीजेची पावले
सांगाल का त्या कोकिळा, की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली
_________________

गीत : आ. रा. देशपांडे "अनिल"
संगीत : यशवंत देव
स्वर : पंडित वसंत्राओ देशपांडे