लख लख चांदणं कोजागिरीच


_____________


शुभ शरद पौर्णिमेच्या (कोजागिरी) शुभेच्छा !!!

____________


लख लख चांदणं कोजागिरीचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

चंदेरी फुलांच्या गोफुन माळा,
चल ये सजणे घाल माझ्या गळा
झिमझिम शिंपीत प्रितीचं चांदणं,
जोडीनं गोडीनं फिरायचं रं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

कुणी नाही इथं हिरव्या रानात,
गुलाबी गुपीत सांग माझ्या कानात
खसखस पिकली पिंपळ पानात
खुदकन मनात हसायचं रं,
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

तेजाचा पाऊस भुईवर पडतोय,
प्रितीचा पारवा नभात उडतोय
फेर धरी चांदवा नाचते पुनवा,
रंगात ढंगात नाचायचं रं,
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !
______________________

गीत     -     पी. सावळाराम
संगीत -     स्‍नेहल भाटकर
स्वर -     आशा भोसले,  दशरथ पुजारी
चित्रपट-    मानला तर देव (१९७०)

तुझा असाच गोडवा


___________


स्वर/संगीत : भीमराव पांचाळे

आयुष्य तेच आहे


______________


आयुष्य तेच आहे
अन्‌ हाच पेच आहे !

बोलू घरी कुणाशी ?
तेही सुनेच आहे !

तू भेटशी नव्याने
बाकी जुनेच आहे !

केलीस याद तूही
का हे खरेच आहे ?
_________________

गीत - संगीता जोशी
संगीत/स्वर - भीमराव पांचाळे

असाच यावा पहाटवारा



_____________________


असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा
आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा

अस्मानाला असा चढावा कैफ सात रंगांचा
मावळतीला चंद्र झुकावा जरा फिकट अंगाचा
हळव्या पानांतून मोहरत मोहक गंध फुलावा

भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे
व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधूर स्वराने
हुंकारातुन असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा

प्रशांततेवर कुणि स्मिताची रेघ अशी रेखावी
मिठीतले क्षण दिठीत टिपण्या तू मजजवळ असावी
लाजलाजुनी असा फुलोरा वेलीवर लहरावा

झुळझुळणार्‍या निर्झरिणींची चरणगती तू घ्यावी
मला पाहण्या तुझी लोचने अशीच झुरत असावी
तव अधरांतिल मरंद माझ्या ओठांवर उतरावा
________________

गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - अनिल मोहिले
स्वर - अरुण दाते

गेली निघून रात्र


____________


एक अप्रतीम मराठी गझल
स्वर : डॉक्टर प्रभा अत्रे