दिसलीस तू फुलले ऋतू


____________


दिसलीस तू, फुलले ऋतू
उजळीत आशा, हसळीस तू

उरले न आसु, विरल्या व्यथाही
सुख होऊनिया, आलीस तू

जाळीत होते मज चांदणे जे
ते अमृताचे, केलेस तू

मौनातुनी ए गाणे दिवाणे
त्याचा अनामी, स्वरभास तू

जन्मात लाभे क्षण एकदा हा
ते भाग्य माझे, झालीस तू
___________________

गीतकार : सुधीर मोघे
संगीतकार : राम फाटक
स्वर : सुधीर फडके