त्या तिथे, पलिकडे, तिकडे

__________
त्या तिथे, पलिकडे, तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे !

गवत उंच दाट दाट
वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे
झाड एक वाकडे...

कौलावर गारवेल
वाऱ्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता
स्वागत हे केवढे !

तिथेच वृत्ति गुंगल्या
चांदराति रंगल्या
कल्पनेत स्वर्ग तो
तिथे मनास सापडे !