राग मारू बिहाग - पं. वसंतराव देशपांडे


_______________


थाट - कल्याण
जाती - औधव - सम्पूर्ण
वादी  स्वर - ग
संवादी स्वर - नी
समय - श्याम
आरोह - नी़ सा ग म प प नी सां ।
अवरोह - सां नी ध प मे ग, मे ग रे सा ।
पकड -  ग मे ग रे सा, सा म ग सा ग मे प ।

आज अचानक गाठ पडे


_________________


आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

नयन वळविता सहज कुठेतरी
एकाएकी तूच पुढे

दचकुनि जागत जीव नीजेतच
क्षणभर अंतरपट उघडे

गूढ खूण तव कळून नाकळून
भांबावुन मागे मुरडे

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे
____________

गीत - आ. रा. देशपांडे 'अनिल'
स्वर/संगीत - पं. कुमार गंधर्व