धुंद होते शब्द सारे !


____________

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना
सई ये रमुनी सार्‍या जगात रिक्त भाव असे
कैसे गुंफू गीत हे ?
धुंद होते शब्द सारे !

मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा !
_________________

गीत : कौस्तुभ सावरकर
संगीत : अमार्त्य राहुल
स्वर : रवींद्र बिजूर
चित्रपट : उत्तरायण

तेजोमय नादब्रम्ह हे


________________________

तेजोमय नादब्रम्ह हे

रुणझुणले काळजात, लखलखले लोचनात
अंबरात अंतरात, एकरूप हे

सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा
सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे

कुसुमाच्या हृदयातून, स्नेहमय अमृतघन
चोहिकडे करुणा तव, बरसून ये स्वरलाघव
परमेशा साद घालि तुझे रूप हे
________________

गीतकार : प्रविण दावणे
संगीतकार : श्रीधर फडके
स्वर : आरती अंकलिकर-टिकेकर व सुरेश वाडकर