राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे

________________


राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपुली का ती खरी, कि स्वप्न माझे ?

कापले ते हात हाती बावरे डोळ्यात आसू
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू
दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तकदीर माझे

गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमले कुंकुमाची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडीसार सांची
आठवे ? म्हटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे

मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे
वेळ दारी सावलीची रोज असुनी बार देते
लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोन पात्र माझे
_________________

गीत : वा. रा. कांत
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : पंडित वसंतराव देशपांडे

11 Response to "राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे"

  1. सुभी Says:
    July 7, 2011 at 11:23:00 PM GMT+5:30

    राहिले डोळ्यात माझ्या, प्रीतीचे ते नयन धागे
    का रे झाली वेळ इतुकी...मन राहिले का तुझ्या मागे
    जवळी नसे तू कधी ...पण भास तुझा सारखा लागे ....
    स्वप्नातली भेट होती पण मन असे रे जागे जागे ..
    आत्म्यात तू जरी असतो ध्यास तुझा हि लागे लागे....

  2. Vishakha Samir Mashankar Says:
    March 15, 2013 at 10:13:00 AM GMT+5:30

    Superb !!

  3. Mangala Rawat Bhoir Says:
    March 15, 2013 at 10:14:00 AM GMT+5:30

    राहिले ओठातल्या ओठात शब्द माझे....हे गाणे इतक्या सुंदर चित्रफितीतून सादर केले आहे , की त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ अनुभवास येतो! आपली गाण्यांची आवड व त्या गाण्याला असें जिवंत स्वरूप देण्याची आपली कला मनाला खूपच भावून जाते. मन:पूर्वक धन्यवाद! अभिजित! शुभदिन!
    hat's off! :))

  4. स्वाती ठकार Says:
    March 15, 2013 at 10:15:00 AM GMT+5:30

    वसंतराव देशपांडे आणि वा रा कांत यानी खूप छान गाणी दिली आहेत

  5. Ramesh Jog Says:
    March 15, 2013 at 10:16:00 AM GMT+5:30

    Excellent The last line is very meaningful Thanks

  6. Renuka Deshpandde Says:
    March 15, 2013 at 10:17:00 AM GMT+5:30

    Atishay sunder shabd..

  7. Upendra Thatte Says:
    March 15, 2013 at 10:17:00 AM GMT+5:30

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  8. Jyoti Kulkarni Gandhe Says:
    March 15, 2013 at 10:18:00 AM GMT+5:30

    excellent......

  9. Bajirao Khot Says:
    March 15, 2013 at 10:19:00 AM GMT+5:30

    khup chhan....

  10. Prashant Aranake Says:
    March 15, 2013 at 10:20:00 AM GMT+5:30

    वा रा कांतांचे शब्द, श्रीनिवास खळयांचे संगीत आणि वसंतरावांचे सूर .....

    त्रिवेणी संगम......

    मन तृप्त झाले ....

    सकाळची सुरवात चांगली झाली ...

    आशा आहे दिवसही चांगला जाइल....

    धन्यवाद अभिजित...

  11. Sunil Aranke Says:
    March 16, 2013 at 12:56:00 AM GMT+5:30

    apratim.............

Post a Comment