तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो मी

 

________________


तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो
मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो

वैराण माळ उघडा बेचैन तळमळे
मी दान आसवांचे फेकीत चाललो

आव्हेरूनी फुलांचे अनिवार आर्जवे
काटेकुटे विखारी वेचित चाललो

दाही दिशांत वेडा वैशाख मातला
मी बाण चंदनाचे पेरीत चाललो

ए कोरड्या गळ्यात हा सूर कोठला
मी तार वेदनेची छेडित चाललो
___________________

गीत : सुधीर मोघे
संगीत : राम फाटके
स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी

2 Response to "तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो मी"

  1. सुभी Says:
    August 7, 2011 at 12:13:00 AM GMT+5:30

    सुख दुःखाच्या संगतीत राहिलो....
    सुख सोडूनी.... मी सदा दु:खात नाहलो...
    म्हणून दु:खाचे डोंगर डोक्यावर मी वाहत राहिलो ....
    असेच वाटते ....

  2. Subhi Says:
    August 7, 2011 at 12:30:00 AM GMT+5:30

    I THOUGHT ITS A "FRIENDSHIP DAY GIFT" BUT..........ANYWAYS...

Post a Comment