सांज ये गोकुळी

____________

सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळयाची जणू साऊली

धूळ उडिवत गाई निघाल्या
शाम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्या सवे, पाखरांचे थवे
पैल घंटा घूमे राऊळी

पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळया चाहूली

माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
______________

गीतकार - सुधीर मोघे
गायक - आशा भोसले
संगीतकार- श्रीधर फडके
चित्रपट - वजीर

6 Response to "सांज ये गोकुळी"

  1. Mangala Bhoir Says:
    May 13, 2012 at 7:47:00 PM GMT+5:30

    शुभसंध्या! अभी-सुभी! अप्रतिम! या गाण्यातील प्रत्येक शब्दाला चित्रातून व कलात्मक तेतून जिवंत करून इतकी सुंदर चित्रफित केली आहे की,गुंग होवून पाहतच राहिले व अनुभवले गाणे! ग्रेट वर्क! मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! :)

  2. Sunetra Jog Says:
    May 13, 2012 at 8:04:00 PM GMT+5:30

    खूपच छान...

  3. Subhi Abhijeet Dalvi Says:
    May 13, 2012 at 10:04:00 PM GMT+5:30

    आशा ताई या माझ्या अतिप्रिय गायिका...त्यांचे झंजावती जीवन आणि त्यातून यशस्वी होवून.. प्रभावी गायन शैली, "युथ आयकॉन" आणि अतिशय रोमांचकारी स्वर.....मस्त रे डब्बू

  4. Ramesh Jog Says:
    May 13, 2012 at 10:04:00 PM GMT+5:30

    Will see if Sudhir Moghe has a painting on this! He is displaying his paintings at Darpan Art Gallery .

  5. Subhi Abhijeet Dalvi Says:
    May 13, 2012 at 11:29:00 PM GMT+5:30

    पण सुंदर जोडीचा फोटो आहे हे काही कमी आहे का सर

  6. Vasudeo Joshi Says:
    May 14, 2012 at 9:49:00 AM GMT+5:30

    सुंदर काव्य ,सुंदर रचना व सुंदर स्वर ...धन्यवाद अभिजित !

Post a Comment