भ्रमर चित्त


________________

भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी
कसली नाती गोती
कितीक धरेवर आले आणिक
कितीक येथुनी जाती
भ्रमर चित्त हे तुम्हा विचारी !! धृ !!

म्हणते माता पुत्र जीवाचा
तोच बंधू रे प्रिय भगिनीचा
कधी जेव्हाला मिळे सखीचा
मरणा नंतर करतील टाहो
एकट्यास का देतील
भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी
कसली नाती गोती !! १ !!

चिता धडाडे चार दिशांनी
जमती सगळे जल नयनांनी
आत सांग पण येतील कोणी
पाहत बसती केवळ दुरुनी
कोण संगती जळती
भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी
कसली नाती गोती !! २ !!

जर सोन्याहून काया सुंदर
कसे लाभले हे ज्वालाघर
चीर विरहाची वाट निरंतर
कबीर सांगतो खुल्या जगाची
नको आस ही भलती
भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी
कसली नाती गोती !! २ !!


कितीक धरेवर आले आणिक
कितीक येथुनी जाती
भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी
कसली नाती गोती कसली नाती गोती
कसली नाती गोती ........!! ३ !!

_________________

17 Response to "भ्रमर चित्त"

  1. Surekha Ja Says:
    November 27, 2010 at 6:50:00 AM GMT+5:30

    हृदस्पर्शी भाव गीत... बाकीबाब यांनी जीवानाचे कटू सत्य अंत्यंत सोप्या आणि भाव स्पर्शी शब्दात मांडले आहे....निसर्गातील एकांत अप्रतीम रीतीने टिपलाय/ चित्रित केला आहे.
    धन्यवाद अभी !!

  2. Madhu Mohan Says:
    November 27, 2010 at 6:59:00 AM GMT+5:30

    Bannkad I LOVED THIS VIDEO ............SORRY WITHOUT UR PERMISSON I AM SHARING IT WITH MY FRNDS..................THNXX FOR POSTING SUCH NICE STUFF.................THNX AGAIN SIR...........

  3. Vrishali Prabhavalkar Says:
    November 28, 2010 at 4:21:00 PM GMT+5:30

    काही बोलण्याच्या पलीकडचे.... बाकिबाबशी तुझे चित्तस्थ नाते ... तितकेच चित्तस्पर्शी चित्रशिल्प तू साकारतोस अभिजीत आणि त्यात सुरेशजींचा ईश्वरीस्पर्श देणारा स्वरसाज... सारेगम...सातव्या स्वर्गाची अनुभूती...मन:पूर्वक धन्यवाद!

  4. Shalini Kanekar Says:
    November 28, 2010 at 4:22:00 PM GMT+5:30

    thanks for such a beautiful song

  5. Upendra Thatte Says:
    November 28, 2010 at 4:22:00 PM GMT+5:30

    छान अनुभव आहे हा. सुरेश वाडकरांचा आवाज मस्तच आहे. शिवाय बा.भ. बोरकरांचे काव्य म्हणजे काही विचारायला नकोच. धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या या भेटीबद्दल.

  6. Vilas Joshi Says:
    November 28, 2010 at 4:22:00 PM GMT+5:30

    Surekh aavaj ani sundar kaavya! Dhanyavaad!

  7. Vaibhav Wagle Says:
    January 20, 2011 at 8:21:00 PM GMT+5:30

    hats of 2 u abhi...Gr8 lyrics gr8 song mare...die to vist goa soon....

  8. Surekha Ja Says:
    January 27, 2011 at 12:54:00 AM GMT+5:30

    ma extremely favt.... everything... lyrics.. suresh wadkar..video ...

  9. Sujata Shashank Phadke Says:
    July 3, 2011 at 5:50:00 PM GMT+5:30

    सोन्याहुनी सुंदर काव्य अन सुरेशजींचा घनगंभीर स्वर..अनमोल भेट!!!

  10. Siddharth Jadhav Says:
    July 25, 2011 at 9:34:00 PM GMT+5:30

    जीवनाची गाथा ही अतिशय वेदनादायक असताना पण... मानवी मन इतका हव्यास का करते रे...?? तुझे मात्र बरे आहे बुवा "कशाचाच" मोह नाही...हव्यास नाही....देत राहतो सर्वांना "आनंद" रे .....असो मी तुझा खरा खरा FAN झालो ते या तुझ्या गीताला ऐकूनच... आणि हो खरे तर...ग्राफिक पण बघून........भन्नाट आवड रे तुझी.....गीतांची रे .... ;-))

  11. Nainita Sarwate Says:
    August 4, 2011 at 4:37:00 PM GMT+5:30

    Wow!!! thanks for the tag.

  12. Meena Trivedi Says:
    August 5, 2011 at 11:11:00 AM GMT+5:30

    kon sagati jalate.. kasli nati goti..simple truth.. he jwala ghar..

  13. Dhananjay Kulkarni Says:
    August 5, 2011 at 11:12:00 AM GMT+5:30

    It is how " you" perceive.........

  14. Amruta Shirodkar Says:
    December 9, 2011 at 11:40:00 PM GMT+5:30

    khup chhan

  15. Dhananjay Kulkarni Says:
    December 10, 2011 at 7:59:00 AM GMT+5:30

    Eternal truth......

  16. Mangala Bhoir Says:
    September 25, 2012 at 3:18:00 PM GMT+5:30

    Abhijeet Dalvi@Subhi Abhijeet Dalvi......वाह! कवीवर्य बोरकरांचे काव्य व सुरेशजीन स्वर म्हणजे हृदयापर्यंत पोहोचायलाच हवे,व जिवन सत्य हे उमजायलाच हवे! चित्रफित उत्तमच आहे! एक मात्र आहे की आपल्याला शाश्वत प्रेमाची प्रचिती या अशाश्वत नात्या-गोत्यातून मिळते व तीच हे जग सोडताना आपल्या सोबत असते. धन्यवाद! अभि-सुभी शुभदिन! :))))

  17. Ajay Hebare Says:
    March 19, 2013 at 11:15:00 PM GMT+5:30

    nice heart touching sound dear

Post a Comment