कंठ आणि आभाळ दाठूनी येती


____________

कंठ आणि आभाळ दाटून येती
आणि कोसळती ..... सरीवर सरी !

पहिल्या उन्हाची हळद ओली होती
फांदीवर पाने जन्म घेत होती
भवताल त्यांना अजून ठाऊक नव्हता
अशा वेळी आल्या ..... सरीवर सरी !
आणि कोसळल्या ..... सरीवर सरी !

आता कुठे नुकतेच पंख लांब केले
आता कुठे घरट्यातून फांदीवर आले
आभाळ या पिलांचे खूप लांब आहे
अशा वेळी आल्या ..... सरीवर सरी !
आणि कोसळल्या ..... सरीवर सरी !

उधाण आहे आकाश पेलताना
उभ्या जन्माचा पाऊस झेलताना
स्वत:चे स्वत:शी लढणे दिनरात आहे
अशा वेळी आल्या ..... सरीवर सरी !
आणि कोसळल्या ..... सरीवर सरी !
_________________

गीत - गजेंद्र अहिरे
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर - शंकर महादेवन, हरिहरन
चित्रपट- सरीवर सरी (२००५)

4 Response to "कंठ आणि आभाळ दाठूनी येती"

  1. Mangala Bhoir Says:
    May 29, 2012 at 9:51:00 AM GMT+5:30

    कंठ आणि आभाळ दाटून येती..आणि कोसळती सरीवर सरी! .वाह सुंदर! सुप्रभात! अभी-सुभी! :))

  2. Sandhya Choughule Says:
    May 29, 2012 at 9:51:00 AM GMT+5:30

    कंठ आणि आभाळ दाटून येती
    आणि कोसळती .....
    पहिल्या उन्हाची हळद ओली होती
    फांदीवर पाने जन्म घेत होती.........mastach

  3. Sunita Nandu Says:
    May 29, 2012 at 9:52:00 AM GMT+5:30

    कंठ आणि आभाळ दाटून येती
    आणि कोसळती ..... सरीवर सरी !वा किती सुंदर
    सुप्रभात

  4. Meena Trivedi Says:
    May 30, 2012 at 5:24:00 PM GMT+5:30

    kosalti sarivar sari..

Post a Comment