तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना


____________

तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना
अर्थ लाभो जीवनाला हीच अमुची प्रार्थना

चेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही
पृथ्वी-जल-आकाश अन्‌ वायुतही, तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना

एक आहे मागणे हातात या सामर्थ्य येवो
भीक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो
कष्ट करु आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना

घेतले व्रत आज आम्ही स्वप्‍न ते सत्यात येवो
दीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हांस होवो
या जगी आनंद नांदो ही मनाची कामना
__________________

गीत - पवन खेबूडकर
संगीत - अशोक पत्की
स्वर - शौनक अभिषेकी

6 Response to "तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना"

  1. सुमित म्हेत्रे Says:
    November 6, 2012 at 7:40:00 PM GMT+5:30

    घेतले व्रत आज आम्ही स्वप्‍न ते सत्यात येवो
    दीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हांस होवो
    या जगी आनंद नांदो ही मनाची कामना..........

  2. Hemangi Pathak Says:
    November 6, 2012 at 7:41:00 PM GMT+5:30

    "...भीक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो
    कष्ट करु आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना.." wah...wah...apratim!

  3. Subhi Abhijeet Dalvi Says:
    November 7, 2012 at 8:08:00 AM GMT+5:30

    तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना
    अर्थ लाभो जीवनाला हीच अमुची प्रार्थना

    चेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही
    पृथ्वी-जल-आकाश अन्‌ वायुतही, तेजातही
    विश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना

  4. स्वाती ठकार Says:
    November 7, 2012 at 9:15:00 PM GMT+5:30

    अप्रतिम शब्द स्वर संगीत ...धन्यवाद अभी ....तमातून तेजाकडे नेणारे गीत .. :-)

  5. Shalmali Shantanu Gokhale Says:
    November 10, 2012 at 10:22:00 PM GMT+5:30

    शौनक अभिषेकी ...आशय आपल्यापर्यंत अप्रतिम रुपात पोचवतात . धन्यवाद अभी .

  6. Chaitrali Pankaj Janefalkar Says:
    November 10, 2012 at 10:23:00 PM GMT+5:30

    kya bat hai, chanaahe kavya...........................

Post a Comment