________________
भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी
कसली नाती गोती
कितीक धरेवर आले आणिक
कितीक येथुनी जाती
भ्रमर चित्त हे तुम्हा विचारी !! धृ !!
म्हणते माता पुत्र जीवाचा
तोच बंधू रे प्रिय भगिनीचा
कधी जेव्हाला मिळे सखीचा
मरणा नंतर करतील टाहो
एकट्यास का देतील
भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी
कसली नाती गोती !! १ !!
चिता धडाडे चार दिशांनी
जमती सगळे जल नयनांनी
आत सांग पण येतील कोणी
पाहत बसती केवळ दुरुनी
कोण संगती जळती
भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी
कसली नाती गोती !! २ !!
जर सोन्याहून काया सुंदर
कसे लाभले हे ज्वालाघर
चीर विरहाची वाट निरंतर
कबीर सांगतो खुल्या जगाची
नको आस ही भलती
भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी
कसली नाती गोती !! २ !!
कितीक धरेवर आले आणिक
कितीक येथुनी जाती
भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी
कसली नाती गोती कसली नाती गोती
कसली नाती गोती ........!! ३ !!
_________________
17 Comments