जीना यहाँ मरना यहाँ





______________________

Mukesh

वाकल्या दिशा फुलून

_________________
वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रांग सावळा,
या गुलात, या सुरात, चंद्र गालतो गळा
पावले अशी सलील नादाती कुठून नाद ?
मी क्षिदीज वाहतो तरी जुळे न शब्द, गीत

दु:ख एक पांगळे जशी तरुणं सावली
या उरात पेटालीस, का उन्हास काहिली ?
असे कसे सुने सुने मला उदास वाटते
जशी उडून पाखरे नभात चालली कुटे ?
_____________

गीत: ग्रेस
स्वर: अरुण दाते
संगीत: श्रीनिवास खळे

असेन मी, नसेन मी

______________

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलात येथल्या, उद्या हसेल गीत हे

हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले
तृणात फूलपाखरू तसे बसेल गीत हे

स्वये मनात जागले न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
स्वये मनात जागते न सूर ताल मागते

कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ?
निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे
____________

गीत: शांता शेळके
संगीत: यशवंत देव
स्वर: अरुण दाते
राग: भैरवि