घन करुणेचा सूर


______________________

घन करुणेचा सूर, तयातून भरु दे अवघा ऊर
शांत शांत हलकेच होऊ दे, जिवातले काहूर

अरूपाला मी साद घालता
गूढ निलायम मौन बोलता
नश्‍वर वितळून ईश्‍वर उजळो, साधनेस दे नूर

पाषाणातून झरू दे जीवन
असे वाहू दे स्वर संजीवन
ऐल पैल हे मुळी नसावे, असा जागू दे पूर
 ________________

गीत - प्रवीण दवणे
संगीत -  केदार पंडित
स्वर -  पं. संजीव अभ्यंकर