Showing posts with label Arun Date. Show all posts
Showing posts with label Arun Date. Show all posts

हे चांदणे ही चारुता




_______________


हे चांदणे, ही चारुता, ही भावभोळी लोचने
मधुचंद्र हा, मधु यामिनी, ही प्रीतीची मधु गुंजने

पानांतुनी हलके फुले कळी कोवळी सुम होऊनी
मधुगंध हा तव प्रीत का ऐसी सुखाची गायने

सुख मोहरे तनु बावरे हळुवार कापे मोहुनी
ये ये अशी या मानसी फुलवीत प्रीती पैंजणे
____________

गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - अनिल मोहिले
स्वर - कुंदा भागवत, अरुण दाते

असाच यावा पहाटवारा



_____________________


असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा
आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा

अस्मानाला असा चढावा कैफ सात रंगांचा
मावळतीला चंद्र झुकावा जरा फिकट अंगाचा
हळव्या पानांतून मोहरत मोहक गंध फुलावा

भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे
व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधूर स्वराने
हुंकारातुन असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा

प्रशांततेवर कुणि स्मिताची रेघ अशी रेखावी
मिठीतले क्षण दिठीत टिपण्या तू मजजवळ असावी
लाजलाजुनी असा फुलोरा वेलीवर लहरावा

झुळझुळणार्‍या निर्झरिणींची चरणगती तू घ्यावी
मला पाहण्या तुझी लोचने अशीच झुरत असावी
तव अधरांतिल मरंद माझ्या ओठांवर उतरावा
________________

गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - अनिल मोहिले
स्वर - अरुण दाते

शुक्रतारा


________________________


शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दात सांगू, भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा

लाजर्‍या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा

शोधिले स्वप्नात मी ते, ये करी जागेपणी
दाटूनि आलास तू रे, आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
________________

गीतकार: मंगेश पाडगांवकर
स्वर: सुधा मल्होत्रा - अरुण दाते
संगीत: श्रीनिवास खळे

आपूल्या हाती नसते काही

_________________

आपूल्या हाती नसते काही, हे समजावे
कुणी दिसे जर हात आपुले, हाती घ्यावे

कधीच नसतो मातीवरती हक्क आपुला
पाण्याने जर लळा लाविला, रुजून यावे

भिरभिरणार्‍या फुलपाखरा नसेन आशा
विसावले जर, ओजळीचे तर फूल करावे

नको याचना जीव जडवुनी बरसातीची
मेघच जाहले अनीवर, भिजून घ्यावे

नकॉच मनधरनी अर्ताची नको आर्ज़ावे
शब्दानी जर मिठी घातली, गाणे गावे
____________________

गीत: मंगेश पाडगावकर
स्वर: अरुण दाते
संगीत: यशवंत देव

उन असो वा असो सावली



~~~~~~~~~~

आशा भोसले व अरुण दाते यांनी गुंफलेली एक उत्कृष्ट मराठी भावगीत (किव्हा 'ग़ज़ल' म्हण्यास गयिर नाही)