Showing posts with label Kaushik Inamdar. Show all posts
Showing posts with label Kaushik Inamdar. Show all posts

अस्मिता मराठी अभिमानाची




 लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुतलात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
संगीत : कौशिक श्री. इनामदार
:स्वर:
रविंद्र साठे, अश्विनी भिडे देशपांडे, सुरेश वाडकर, आशा खाडिलकर, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, हरिहरन, आरती अंकलीकर टिकेकर, सत्यशील देशपांडे,
श्रीधर फडके, साधना सरगम, शौनक अभिषेकी, संजीव चीम्मालगी, ओंकार दातारकर, सावनी शेंडे साठ्ये, स्वप्नील बांदोडकर, बेला शिंदे, अवधूत गुप्ट, प्रसाद ओके, शैलेश दातार, सुनील बर्वे, सुमित रागवन, सीमा देशमुख, मधुराराणी गोखले प्रभुलकर, स्वानंद किरकरे, विट्टल उमप, देवकी पंडित, उत्तरा केळकर, रंजना जेळकर, शरद जांबेकर, रविंद्र बिजूर, महेश मुतालिक, अनिरूध्द जोशी, सलील कुलकर्णी, माधुरी करमरकर, अनघा पेंडसे, मृदुला दाटे जोशी, माधव भागवत, सुचित्रा भागवत, वर्षा भावे, भाग्यश्री मुळे, संगीता चितळे, अनुजा वर्तक, अनघा ठोम्से, आनंदी जोशी, सायली ओक, मधुरा कुंभार, मधुरा अय्यर, मिलिंद इंगळे, अशोक हांडे, अच्युत ठाकूर, उदेश उमप, नंदेश उमप, आदेश उमप, अंदेश उमप, कौशिक श्री. इनामदार, वैशाली सावंत, अजय-अतुल, शंकर महादेवन, हम्सिका अय्यर, निहिरा जोशी, अजित परब, ऋषिकेश कामेरकर, अमोल बावडेकर, योगिता पाठकर, अमृता नातू, विभावरी आपटे जोशी, मधुरा दातार, संजीवनी भेलांडे, मिलिंद जोशी, मनीषा जोशी, निलेश मोहरीर, योगिता चितळे, कल्याणी पांडे साळुंके, राजा काळे, राम देशपांडे, जितेंद्र अभ्यंकर, ऋषिकेश रानडे, मंदार आपटे, आनंद सावंत, अभिजित राणे, नेहा राजपाल, शिल्पा पै, जान्हवी प्रभू अरोरा, सोनाली कर्णिक, स्वप्नजा लेले, मयुरेश पै, मिथिलेश पाटणकर, विनय राजवाडे, मनोज देसाई, प्रशांत काळून्द्रेकर, संदीप उभाळे, अमृता काळे, उमेश जोशी, केतकी गोडबोले, मंगेश चव्हाण, निलेश मुळ्ये, मयुरेश मडगावकर, आलाप भागवत, श्रीरंग भावे, रसिका जोगळेकर, अनन्या भौमिक, सायली महाडिक, सुचिता इनामदार, केतकी भावे, अदिती कुलकर्णी, प्रगती जोशी, अश्विनी परांजपे, श्रुती भावे, मुग्धा वैशम्पायकर, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राउत, मुग्धा वैशम्पायन ३५० समूहगायक.