Showing posts with label सांगले ऐका (१९५९). Show all posts
Showing posts with label सांगले ऐका (१९५९). Show all posts

किरण आशेचा !!!



_______________________

बुगडी माझी सांडली ग
जाता सातार्‍याला ग जाता सातार्‍याला
चुगली नगा सांगू ग
माझ्या म्हातार्‍याला ग माझ्या म्हातार्‍याला

माझ्या शेजारी तरुण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधी खुलेमे जवळ बाहतो
कधी नाही ते भुलले ग बाई
त्याच्या इशार्‍याला त्याच्या इशार्‍याला

घरात न्हवते तेव्हा बाबा
माझ्या मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई... तोबा तोबा
वितळू लागे ग लोणी बाई
बघता निखार्‍याला बघता निखार्‍याला

त्याने आणिली अपुली गाडी
तयार जुंपुनी खिलार जोडी
मीही ल्याले ग पिवळी साडी
वेड्यावाणी जोडीने ग गेलो
आम्ही बाजाराला आम्ही बाजाराला !

येण्या आधी बाबा परतून
पोचालार मी घरात जाउन
मग पुसतील काना पाहून
काय तेव्हा सांगू मी ग बाई
त्याला बिचार्‍याला त्याला बिचार्‍याला !
__________________

चित्रपट : सांगले ऐका (१९५९)
गीत : ग. गी. माडगुलकर
संगीत : राम कदम
स्वर : आशा भोसले