माझे दिवन गाणे


__________________


माझे दिवन गाणे, माझे दिवन गाणे !

व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !

कधी ऐकतो गीत झर्यातुन
वशवनाच्या कधी मनातुन
कधि वार्‍यातून, कधि तार्यातुन झुळझुळतात तराणे !

तो लीलाघन सत्य चिरंतन
फुलापरी उमले गीतातुन
स्वरास्वरातुन आनंदाचे नित्य नवे नजराणे !

गा विहगांनो माझ्यासंगे
सुरावरी हा जीव तरंगे
तुमच्यापरी माझ्याही स्वरातुन उसळे प्रेम दिवाणे !
________________

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : पु. ल. देशपांडे
स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी

शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले

 
______________________

शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियाले आणिक घडू नये ते घडले

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन् ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ?

होय म्हणालिस नकोनकोतुन
तूच व्यक्त झालीस स्वरातुन
नसता कारण व्याकुळ होऊन उगिच हृदय धडधडले

आठवले पुनावेच्या रात्री
लक्ष दीप विरघळले गात्री
मिठीत तुझीया या विश्वाचे रहस्य मज उलगडले
_______________________

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : पु. ल. देशपांडे
स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी