Showing posts with label Kumar Gandharv. Show all posts
Showing posts with label Kumar Gandharv. Show all posts

आज अचानक गाठ पडे


_________________


आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

नयन वळविता सहज कुठेतरी
एकाएकी तूच पुढे

दचकुनि जागत जीव नीजेतच
क्षणभर अंतरपट उघडे

गूढ खूण तव कळून नाकळून
भांबावुन मागे मुरडे

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे
____________

गीत - आ. रा. देशपांडे 'अनिल'
स्वर/संगीत - पं. कुमार गंधर्व

अजुनी रुसून आहे



~~~~~~~~~~

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटते तसेच ओठ, कि पाकळी हले ना !

समजून मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताही तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, कि बोल बोलवेना !

का भावली मिठाची, अश्रूत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अ!I सुटेना
मिटविल अंतराला, ऐसी मिठी जुटे ना !

की गुड काही डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघाल्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !
_________________________

गीत : आ . रा . देशपांडे 'अनिल'
संगीत : पंडित कुमार गंधर्व
स्वर : पंडित कुमार गंधर्व