Showing posts with label shanta shelke. Show all posts
Showing posts with label shanta shelke. Show all posts

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !



________________________

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
जटाजूट माथ्यावरी
चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास लिंपुन राहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !


जन्मजन्मांचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी, की म्हणू भोगी ?
शैलसुता संगे, गंगा मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
________________

गीत - शान्‍ता शेळके
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले, उषा मंगेशकर, राणी वर्मा, रंजना जोगळेकर

पप्पा सांगा कुणाचे ?


_________________


ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला

पप्पा सांगा कुणाचे ? पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ? मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात
चिमणा-चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ झेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे !
______________________

गीत  -  शान्‍ता शेळके
संगीत -  सी. रामचंद्र
स्वर -  राणी वर्मा,  प्रमिला दातार,  अरुण सरनाईक
चित्रपट- घरकुल (१९७०)