आयुष्याची आता...


______________

आयुष्याची आता झाली उजवण,
येती तो तो क्षण अमृताचा;

जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब,
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे;

सुखोत्सवे असा जीव अनावर,
पिंजर्याचे दार उघडावे;

संधिप्रकाशात अजून जो सोने,
तो माझी लोचने मिटो यावी;

असावीस पास, जसा स्वप्रभास,
जीवी कासावीस झाल्यावीण;

तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण त्याची नाही;

तूच ओढलेले त्यासवे दे पाणी,
थोर ना त्याहनी तीर्थ दुजे;

वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल,
भुलीतली भूल शेवटली.
____________

गीत : बाकीबाब बोरकर
स्वर/संगीत : सलील कुलकर्णी