Showing posts with label Dattaa Davjekar. Show all posts
Showing posts with label Dattaa Davjekar. Show all posts

गोमु माहेरला जाते हो नाखवा



________________

गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा

दावा कोकणची निळी-निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी-हिरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा

कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा

सोडून दे रे खोड्या सार्‍या
शिडात शिर रे अवखळ वार्‍या
झणी धरणीला गलबत टेकवा
_____________

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - पं. जितेंद्र अभिषेकी