दे साद दे हृदया



______________


दे साद दे, हृदया
जन्मांतरींचा ध्यास हो, हृदया

तृष्णेचा घट हा, धन हे माझे;
जळ हे भवती गमले ओझे
पैलतिरीचा मेघ हो हृदया

जन्मांचा पथ हा, जुळले धागे
छायेपरी ही नियती येई मागे
त्या संचिताचा सूर हो हृदया

जागली क्षणघनमाला
जन्मच अवघा बरसून आला
त्या चेतनेचा श्वास हो हृदया
_____________

गीत - प्रवीण दवणे
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आरती अंकलीकर-टिकेकर, सुरेश वाडकर