Showing posts with label jaywant kulkarni. Show all posts
Showing posts with label jaywant kulkarni. Show all posts

जे जे सुंदर ते माझे घर

______________


जे जे सुंदर ते माझे घर
मी तर आहे मस्त कलंदर
मासात कलंदर !!!

अडलेल्यांना देलो हात
एकाकाची करितो साथ
सुखदु:खी मी शांत राहतो
पुढेच जातो, गाणी गातो,
श्रमुन कमवितो माझी भाकर
मी तर आहे मस्त कलंदर
मासात कलंदर !!!

जीवन म्हणजे केवळ वाट
केव्हा उतरण केव्हा घाट
ध्येय ध्येयसे वाटे लोका
चुकून लाभते कोणा एका,
म्हणून चालतो असा निरंतर
मी तर आहे मस्त कलंदर
मासात कलंदर !!!

सह पाथिकांनो डरता काय
उगीच डोळे भरता काय
चाले त्याचे भाग्य चालते
थांबे त्याचे दैव थांबते,
उचला पाऊल उचला सत्वर
मी तर आहे मस्त कलंदर
मासात कलंदर !!!