____________
माणसे गेली तरी ही सावल्या उरतात मागे हे
उन्हाचे खेळ सारे का असे छळतात मागे? ||धृ||
उन्हाचे खेळ सारे का असे छळतात मागे? ||धृ||
लाभते जेव्या यशाला सूर्य तेजाची झळाळी
प्रेम ओल्या भावनांच्या प्रार्थना असतात मागे ||१||
अंत प्रेमाच्या क्षणांचा शेवटी विरहात होतो
अन गुलाबी वेदनांच्या पाकळ्या सलतात मागे ||२||
रोज त्यांच्या काळजातुन शब्द हा उमटेल माझा
पाहुनी माझी फकिरी आज जे हसतात मागे ||३||
______________
गीत : अनिल कांबळे
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
10 Comments