Showing posts with label Shridhar Phadke. Show all posts
Showing posts with label Shridhar Phadke. Show all posts

मन मनास उमगत नाही


___________________


मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा
_________________________________

गीतकार :सुधीर मोघे
गायक :श्रीधर फडके
संगीतकार :श्रीधर फडके

दे साद दे हृदया



______________


दे साद दे, हृदया
जन्मांतरींचा ध्यास हो, हृदया

तृष्णेचा घट हा, धन हे माझे;
जळ हे भवती गमले ओझे
पैलतिरीचा मेघ हो हृदया

जन्मांचा पथ हा, जुळले धागे
छायेपरी ही नियती येई मागे
त्या संचिताचा सूर हो हृदया

जागली क्षणघनमाला
जन्मच अवघा बरसून आला
त्या चेतनेचा श्वास हो हृदया
_____________

गीत - प्रवीण दवणे
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आरती अंकलीकर-टिकेकर, सुरेश वाडकर

तेजोमय नादब्रम्ह हे


________________________

तेजोमय नादब्रम्ह हे

रुणझुणले काळजात, लखलखले लोचनात
अंबरात अंतरात, एकरूप हे

सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा
सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे

कुसुमाच्या हृदयातून, स्नेहमय अमृतघन
चोहिकडे करुणा तव, बरसून ये स्वरलाघव
परमेशा साद घालि तुझे रूप हे
________________

गीतकार : प्रविण दावणे
संगीतकार : श्रीधर फडके
स्वर : आरती अंकलिकर-टिकेकर व सुरेश वाडकर

अबोलीचे बोल

__________


अबोलीचे बोल
तसे दुख माझे खोल खोल खोल
अबोलीचे बोल
दुख दिले झदा त्याची ढग माझया हादा
झाडातून झाडातून वीज लावे
भूमीहून खोल
अबोलीचे बोल

गणपतीची माती कालवातो हाती
बोटनच गणरया बोटनच गणराया
फुटे खोल खोल
अबोलीचे बोल

अबोलीचे बोल त्याने वीट माउ माउ
मझा मीच असा क्षणी लागेआर्त् घेऊ
ठाळ धरी बोल
डोल विठु डोल मझा डोल विठु डोल
अबोलीचे बोल
तसे दुख माझे खोल खोल खोल
अबोलीचे बोल
____________

स्वर संगीत : श्रीधर फडके

घर असावे


______________

ह्या भावगीता मागे माझ्या काही खास आठवणी...
पुण्याच्या नगरीत माझी पहिली १९९०-१९९१ च्या सुमारास झाली. कोकणाच्या ऐयर-गैर ग्रॅजुयेशन पर्यंत गोव्यात होतो. घराच्या चार चवकठात खुल्या मानाने बोलण्याची संधी जवळ जवळ नसल्यातच जमा. मग, गाणे अयकणे, बघणे हाच एक उपाय होता. पण जेव्हा पुण्यात आलो, पहिली पुणे केम्प मधील हिन्दी शाळेतले मुख्य प्राध्यापक सुधाकर प्रभू काकांकडे रहायचो. इथून आयुषाचे नवीन अ-ब-क-ड चालू झाले. त्या सुमारास, प्रभात रोडला एका झेरॉक्ष च्या दुकानात मल्टिपल प्रिंट करून ठेवलेली कविता मनात टपली. मनात कायमची राहिलेली ही कविता आणि ३ खास लोकांकडून मला असंख्य मानसिक बळ, आधार, चेतना आणि एक नवीन जिध्ह असंख्य पणे वाडली. एक शिक्षक, गुरू बरोबर एक मित्र ह्या नात्याने सुध्हा असंख्य प्रेम त्यांच्याकडून मला मिळाले. प्रा. सुधाकर काका कायम हसमुक असायचे. दुसरे म्हणजेच भैईया वैद्य. त्यावेळेस ते डेक्कन बधील आपटे शाळेचे मुख्य प्राध्यापक होते. भैईया काका कायम म्हणायचे 'आपल्या जिध्हिने पुढे चाल, जग तुझ्या मागे येईल'. पोस्ट ग्रॅजुयेशन करताना तीसरे खास म्हणजेच डॉ. शेजवलकर !!!
आणि आयुषाच्या प्रत्तेक टप्प्यात ती कविता व ते तीन 'मित्र', नसा नसात जिवंत राहीले. बर्‍याच वर्षानंतर जेव्हा ती कविता व त्याचे स्वर/संगीत अयकले की जुन्या आठवणी उजणतात. फेसबुक वर स्टिल इमेज पधतिने रिलीस केली होती. पण पुन्हा एकदा पूर्ण विडियो द्वारे. त्याही बरोबार त्या तीन 'मैत्र' व गुरू प्राध्यापकांना शतः प्रणाम!
______________

घर असावे घरा सारखे, नकोच नुसत्या भिंती
इथे असावे प्रेम जिव्हाला, नकोच नुसती नाती.

त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी
अश्रुतुनही प्रित झरावी, नकोत नुसते पाणी

या घर्ट्यातून पिल्लू उडावे, दिव्या घेउनी शक्ति
आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ति


_______________

गीत : विमल लिमये
स्वर/संगीत : श्रीधर फडके


काही बोलायाचे आहे


____________

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही
________________

गीत :कुसुमाग्रज
गायक :श्रीधर फडके
संगीतकार :यशवंत देव