Showing posts with label Salil Kulkarni. Show all posts
Showing posts with label Salil Kulkarni. Show all posts

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो



___________________

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

असेच रोज न्हाउनी लपेट ऊन्ह कोवळे
असेच चिंब केस तू उन्हांत सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो

अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले
असेच सांग लाजुनी कळ्यांस गूज आपुले
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो

तसा न राहिला अता उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी जिथे तिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो
___________

गीत  - सुरेश भट
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर - हृषिकेश रानडे

घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस


____________

घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
थोडे  घेऊन ठेवून मग थोडे निघाला दिवस
थोडे घेऊन ठेवून  पुढे  निघाला दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस

असे  मुख मावळतीचे उदास उदास
तसा गार वारा वाहे जसा खोल श्वास
असे  मुख मावळतीचे उदास उदास
तसा गार वारा वाहे जसा खोल श्वास श्वास
दूरच्या दिव्यांना देत निघाला दिवस
श्वास दूरच्या दिव्यांना देत निघाला दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस

विझवूनी  दिवसाचा दीप पेटवून रात
पडे देह अवनीचा या तमाच्या कुशीत
विझवूनी दिवसाचा दीप पेटवून रात
पडे देह अवनीचा या तमाच्या कुशीत
थोडा अधिरसा श्वास थोडा दिलासा दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस

आता गाऊ द्यावे गाणे जसे गाऊ वाटे
अंगणात येतील स्वप्ने पहाटे पहाटे
आता गाऊ द्यावे गाणे जसे गाऊ वाटे
अंगणात येतील स्वप्ने पहाटे पहाटे
गावं मन नाव ज्याचे त्याची ढासळती वेस
गावं मन नाव ज्याचे त्याची ढासळती वेस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
थोडे घेऊन ठेवून पुढे  मग निघाला दिवस

घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
___________________

गीत : शैलेश रानडे
स्वर / संगीत : डॉ. सलील कुलकर्णी

ज्ञानीयांचे ध्येय


_________________


ज्ञानीयांचे ध्येय
पुंडलीकाचे प्रिय सुखवस्तू
ते हे संचरण उभे विठेवरी
पाहा भीमातीरी विठ्ठालरूप || धृ ||

जे तपसवीयांचे तप, जे जपकांचे जाप्य
योगियांचे गौप्य परमधाम
जे तेजकांचे तेज, जे गुरूमंत्रांचे गूज
पूजकांचे पुज्य कुलदयवत || १ ||

जे जीवनात जिबवीते, पवनाते नीववीते
जे भक्तांचे उगवीते मायाजाळ
नामा म्हणे ते सुखाची आयाते
जोडले पुंडलिकते भाग्यायोगे || २ ||
________________

गीत : संत नामदेव
स्वर / संगीत : सलील कुलकर्णी