__________________
धुंद मंद ही अशीच सांज उतरली
गगनातुनी येता सख्या
तुझीया प्रीतीची मधुर फुले ही !! धृ !!
रजनी चे ही मधुर गीत
सूर उमलली
गगनी नील हरित वेल कुंज बहरली
हृदयातूनी फुलती किती
हळव्या प्रीतीची मृदुल दले ही !! १ !!
चांदण्यात तरल तेज
स्वप्न वीखुरले
पान पान पवन मंद गंध परिमळे
तुझीया सवे सख्या असे
मजला नवतीचे सुख हे मिळे ही
धुंद मंद ही अशीच सांज उतरली !! २ !!
______________________
गीत : शांताराम नंदगावकर
संगीत : अनिल - अरुण
स्वर : पद्मजा फेणाणी
28 Comments