वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरे |
पक्षी ही सुस्वरे आळविती ||१||
येणें सुखें रुचे एकांताचा वास |
नाही गुण दोष अंगा येत ||२||
आकाश मंडप पृथुवी आसन |
रामे तेथें मन क्रीडा करी ||३||
कंथा कुमंडलु देहउपचारा |
जाणवितो वारा अवसरु ||४||
हरिकथा भोजन परवडी विस्तार |
करोनी प्रकार सेवू रुची ||५||
तुका म्हणे होय मनाची संवाद |
आपुला चि वाद आपणासी ||६||
*
रचना : संत तुकाराम
संगीतकार : श्रीनिवास खळे
स्वर : लता मंगेशकर
14 Comments