Showing posts with label Shrinivas KhaLe. Show all posts
Showing posts with label Shrinivas KhaLe. Show all posts

गेले, ते दिन गेले !


________________


वेगवेगळी फुले उमलली रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले
गेले, ते दिन गेले !

कदंब-तरूला बांधुन दोला उंच-खालती झोले
परस्परांनी दिले-घेतले
गेले, ते दिन गेले !

हरित-बिलोरी वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनी किती झोकले
गेले, ते दिन गेले

निर्मलभावे नव देखावे भरुनी दोन्ही डोळे
तू मी मिळुनी रोज पाहिले
गेले, ते दिन गेले !
________________

गीत  -  भवानीशंकर पंडित
संगीत -  श्रीनिवास खळे
स्वर  -  पं. हृदयनाथ मंगेशकर
 

वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरे

 
वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरे |
पक्षी ही सुस्वरे आळविती ||१||
 
येणें सुखें रुचे एकांताचा वास |
नाही गुण दोष अंगा येत ||२||
आकाश मंडप पृथुवी आसन |
रामे तेथें मन क्रीडा करी ||३||
कंथा कुमंडलु देहउपचारा |
जाणवितो वारा अवसरु ||४||
हरिकथा भोजन परवडी विस्तार |
करोनी प्रकार सेवू रुची ||५||
तुका म्हणे होय मनाची संवाद |
आपुला चि वाद आपणासी ||६||
*
संगीतकार : श्रीनिवास खळे
स्वर : लता मंगेशकर
 

शुक्रतारा


________________________


शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दात सांगू, भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा

लाजर्‍या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा

शोधिले स्वप्नात मी ते, ये करी जागेपणी
दाटूनि आलास तू रे, आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
________________

गीतकार: मंगेश पाडगांवकर
स्वर: सुधा मल्होत्रा - अरुण दाते
संगीत: श्रीनिवास खळे

याच साठी केला अठहास

 

______________

याच साथी केला अठहास शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
आता निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥

 ________________
 
शब्द : संत तुकाराम संगीतकात : श्रीनिवास खळे
स्वर : पंडित भीमसेन जोशी