Showing posts with label Padmaja Phenani-Joglekar. Show all posts
Showing posts with label Padmaja Phenani-Joglekar. Show all posts

अर्धीच रात्र वेडी

_____________

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले, जाता सरून गेले
नाही हिशेब केले, येतील शाप कानी

आता न सांध्यतारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फूलदाणी
______________

गीत : विंदा करंदीकर
संगीत : यशवंत देव
स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर