Showing posts with label Suresh Bhat. Show all posts
Showing posts with label Suresh Bhat. Show all posts

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !


_________________

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नांत चूर
तिकडे पाऊल तुझे उंबर्‍यात अडखळेल !

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल !

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल !

जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दर्वळेल !

जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल !

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल !
_________________________

गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो



___________________

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

असेच रोज न्हाउनी लपेट ऊन्ह कोवळे
असेच चिंब केस तू उन्हांत सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो

अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले
असेच सांग लाजुनी कळ्यांस गूज आपुले
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो

तसा न राहिला अता उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी जिथे तिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो
___________

गीत  - सुरेश भट
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर - हृषिकेश रानडे

चंद्र अर्धा राहिला


___________  


चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहीली
भेट अर्धी, गीत अर्धे, प्रित अर्धी रहिली

मोकळे बोलु कसे मी, शब्द पाठी थांबले
लाजऱ्या डोळ्यात माझ्या चित्र अर्धे देखीले
ओठ अर्धे विलगले, अर्ध उमलली पाकळी

चंद्र अर्धा..............

बिलगुनी रमल्या तरुंशी, पेंगलेल्या सावल्या
तो निळा एकांत तेथे भावना भारावल्या
धुंद झाल्या दशदिशा, रात्र ही उल्हासली

चंद्र अर्धा............

वाकले आकाश खाली, दुर त्या क्षीतिजावरी
चांद्णे धुंडित वारा पोहला वेलीवरी
भेट झाल्या श्रुष्टी ही , अर्ध झुकली रात्र ही

चंद्र अर्धा..........
________________

गीत : सुरेश भट
स्वर : कृष्णा कल्ले

दूरच्या रानातल्या बकुळीच्या तळी

___________________

अस्मिता मराठी अभिमानाची




 लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुतलात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
संगीत : कौशिक श्री. इनामदार
:स्वर:
रविंद्र साठे, अश्विनी भिडे देशपांडे, सुरेश वाडकर, आशा खाडिलकर, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, हरिहरन, आरती अंकलीकर टिकेकर, सत्यशील देशपांडे,
श्रीधर फडके, साधना सरगम, शौनक अभिषेकी, संजीव चीम्मालगी, ओंकार दातारकर, सावनी शेंडे साठ्ये, स्वप्नील बांदोडकर, बेला शिंदे, अवधूत गुप्ट, प्रसाद ओके, शैलेश दातार, सुनील बर्वे, सुमित रागवन, सीमा देशमुख, मधुराराणी गोखले प्रभुलकर, स्वानंद किरकरे, विट्टल उमप, देवकी पंडित, उत्तरा केळकर, रंजना जेळकर, शरद जांबेकर, रविंद्र बिजूर, महेश मुतालिक, अनिरूध्द जोशी, सलील कुलकर्णी, माधुरी करमरकर, अनघा पेंडसे, मृदुला दाटे जोशी, माधव भागवत, सुचित्रा भागवत, वर्षा भावे, भाग्यश्री मुळे, संगीता चितळे, अनुजा वर्तक, अनघा ठोम्से, आनंदी जोशी, सायली ओक, मधुरा कुंभार, मधुरा अय्यर, मिलिंद इंगळे, अशोक हांडे, अच्युत ठाकूर, उदेश उमप, नंदेश उमप, आदेश उमप, अंदेश उमप, कौशिक श्री. इनामदार, वैशाली सावंत, अजय-अतुल, शंकर महादेवन, हम्सिका अय्यर, निहिरा जोशी, अजित परब, ऋषिकेश कामेरकर, अमोल बावडेकर, योगिता पाठकर, अमृता नातू, विभावरी आपटे जोशी, मधुरा दातार, संजीवनी भेलांडे, मिलिंद जोशी, मनीषा जोशी, निलेश मोहरीर, योगिता चितळे, कल्याणी पांडे साळुंके, राजा काळे, राम देशपांडे, जितेंद्र अभ्यंकर, ऋषिकेश रानडे, मंदार आपटे, आनंद सावंत, अभिजित राणे, नेहा राजपाल, शिल्पा पै, जान्हवी प्रभू अरोरा, सोनाली कर्णिक, स्वप्नजा लेले, मयुरेश पै, मिथिलेश पाटणकर, विनय राजवाडे, मनोज देसाई, प्रशांत काळून्द्रेकर, संदीप उभाळे, अमृता काळे, उमेश जोशी, केतकी गोडबोले, मंगेश चव्हाण, निलेश मुळ्ये, मयुरेश मडगावकर, आलाप भागवत, श्रीरंग भावे, रसिका जोगळेकर, अनन्या भौमिक, सायली महाडिक, सुचिता इनामदार, केतकी भावे, अदिती कुलकर्णी, प्रगती जोशी, अश्विनी परांजपे, श्रुती भावे, मुग्धा वैशम्पायकर, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राउत, मुग्धा वैशम्पायन ३५० समूहगायक.

पहाटे पहाटे मला जाग आली


_________________


पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली

मला आठवेना, तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला
असा राहू दे हात, माझा उशाला
मऊ मोकळे केस, हे सोड गाली

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणार्‍या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली
___________

गीत : सुरेश भट
स्वर/संगीत : सी. रामचंद्र