मानसीचा चित्रकार तो



_________________


मानसीचा चित्रकार तो
मानसीचा चित्रकार तो
तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो

भेट पहिली अपुली घडता
निळी मोहिनी नयनी हसता
उडे पापणी किंचित ढळता
गोड कपोली रंग उषेचे, रंग उषेचे भरतो

मम स्पर्शाने तुझी मुग्धता
होत बोलकी तुला नकळता
माझ्याविण ही तुझी चारुता
मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो

तुझ्यापरी तव प्रीतीसरिता
संगम देखून मागे फिरता
हसरी संध्या रजनी होता
नक्षत्रांचा नीळा चांदवा, नीळा चांदवा झरतो
____________

गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर