कशी तुझ समजावू सांग ?



___________________

कशी तुझ समजावू सांग ?
का भामिनी उगिच राग ?

अस्याहून मधु रुसवा
हेमंती उष्ण हवा
संध्येचा साज नवा
हा का प्रणयानुराग ?

चाफेकळी केवी फुले
ओठ-कमल जेवी उले
भोवती मधुगंध पाले
का प्रसन्न वादन राग ?

वृत्तीचा होम अमुप
त्यात जाळू गे विकल्प
होवूनिया निर्विकल्प
अक्षय करू यज-याग

ओठांचे फेड बंध
गा इकडे मुक्तछंद
श्वासांचे करू प्रबंद
हृदयांचे मधु प्रयाग
______________

गीत : बाकीबाब बोरकर
स्वर / संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी

अंतरिचा बोल सखे

 ___________

केशी तुझीया...


_______________

केशी तुझिया फुले उगवतील ओ ओ ,तुला कशाला वेणी ?
चांदण्यास शिणगार कशाला ?चांदण्यास शिणगार कशाला ?
बसशील तेथे लेणी !!
तुला कशाला वेणी ?
काळोखातही नीळ फुलवशील
...चमेलीत बन वाटा
तळमळणाऱ्या पुळणीवर
आणतिल मोगरी लाटा
पहाटशी तू अमल निरागस
संध्ये परिस ही भोळी
जुन्याच ओळी गुणगुणताना
जमतील सोन पिसोळी.....
तुला कशाला वेणी!...बसशील तेथे लेणी
तुझी पावले ..पावलेss पावले भिडता येईल
तीर्थ कळा पाण्याला
स्वरांच्या उठतो तुझ्या.. स्वरांच्या स्पर्शे येईल
अर्थ नवा गाण्याला
वाळूतील ही तृण पात्याशी
तुझे कोवळे नाते !
तुझ्या दिठीने क्षितीजीचेही अभ्र वितळून जाssते !
तुला कशाला वेणी!..
अशा तुला का हवे प्रसाधन! तूच तुझे ग लेणे !!
तुला पाहिल्यामुळे आमुचे कृतार्थ इथले येणे.... कृतार्थ इथले येणे !!!
तूच तुझे ग लेणे ...
केशी तुझिया फुले उगवतील ,तुला कशाला वेणी ?
चांदण्यास शिणगार कशाला ? बसशील तेथे लेणी !
तुला कशाला वेणी ?

_____________________