____________
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
थोडे घेऊन ठेवून मग थोडे निघाला दिवस
थोडे घेऊन ठेवून पुढे निघाला दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
असे मुख मावळतीचे उदास उदास
तसा गार वारा वाहे जसा खोल श्वास
असे मुख मावळतीचे उदास उदास
तसा गार वारा वाहे जसा खोल श्वास श्वास
दूरच्या दिव्यांना देत निघाला दिवस
श्वास दूरच्या दिव्यांना देत निघाला दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
विझवूनी दिवसाचा दीप पेटवून रात
पडे देह अवनीचा या तमाच्या कुशीत
विझवूनी दिवसाचा दीप पेटवून रात
पडे देह अवनीचा या तमाच्या कुशीत
थोडा अधिरसा श्वास थोडा दिलासा दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
आता गाऊ द्यावे गाणे जसे गाऊ वाटे
अंगणात येतील स्वप्ने पहाटे पहाटे
आता गाऊ द्यावे गाणे जसे गाऊ वाटे
अंगणात येतील स्वप्ने पहाटे पहाटे
गावं मन नाव ज्याचे त्याची ढासळती वेस
गावं मन नाव ज्याचे त्याची ढासळती वेस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
थोडे घेऊन ठेवून पुढे मग निघाला दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
___________________
गीत : शैलेश रानडे
स्वर / संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
11 Comments