करितां विचार सांपडलें वर्म !


_________________


करितां विचार सांपडलें वर्म ।
समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥

मज घेऊनिया आपणांसी द्यावें ।
साटी जीवें जीवें नारायणा ॥२॥

उरी नाहीं मग पडदा कां आला ।
स्वमुखें चि भला करितां वाद ॥३॥

तुका म्हणे माझें खरें देणें घेणें ।
तुम्ही साक्षी जाणें अंतरीचें ॥४॥
______________________

रचना -  संत तुकाराम
स्वर  -  प्रभाकर कारेकर

गेले, ते दिन गेले !


________________


वेगवेगळी फुले उमलली रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले
गेले, ते दिन गेले !

कदंब-तरूला बांधुन दोला उंच-खालती झोले
परस्परांनी दिले-घेतले
गेले, ते दिन गेले !

हरित-बिलोरी वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनी किती झोकले
गेले, ते दिन गेले

निर्मलभावे नव देखावे भरुनी दोन्ही डोळे
तू मी मिळुनी रोज पाहिले
गेले, ते दिन गेले !
________________

गीत  -  भवानीशंकर पंडित
संगीत -  श्रीनिवास खळे
स्वर  -  पं. हृदयनाथ मंगेशकर
 

A Message


__________________


LEARN and HELP
as if you are going to live forever.
LIVE
as if you were going to die tomorrow.