Showing posts with label आयुषाची एक अलौकिक परिभाषा. Show all posts
Showing posts with label आयुषाची एक अलौकिक परिभाषा. Show all posts

आयुषाची एक अलौकिक परिभाषा

जेव्हा हे बघितल तेव्हा तन-मन स्थबध झाल. ह्यातील एक असामान्य 'त्रिलोक' संगमाचा स्पर्श जाणवला. घराच्या 'त्रिकोणाचा' हा सुख-दुखाचा आधार शिल्प... मनातल्या मनात रडलो पण ह्या किव्हा अश्या प्रेमाचा धागा मनात टपला आणि अश्या वेळेस विंदा करंदीकरांची 'ज्वलंत' कविता मनावर दाटली.


चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायाचे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा, विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे
आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे, बेसावधास कैसे डसणार हे निखारे?