हे जीवन सुंदर आहे


__________


हे जीवन सुंदर आहे !

नितळ निळाई आकाशाची अन् क्षितिजाची लाली
दवांत भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी
कोठेही जा अवतीभवती निसर्ग एकच आहे
हे जीवन सुंदर आहे !

पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबील पक्षांची
झूळझुळ पाणी वेळूमधुनी खुळी शीळ वार्‍याची
इथेतिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे
हे जीवन सुंदर आहे !
_____________

गीत: सुधीर मोगे
संगीत: आनंद मोडक
स्वर: आशा भोसले, रविंद्र साठे, अंजली मराठे
चित्रपट: चौकट राजा






10 Response to "हे जीवन सुंदर आहे"

  1. Subhi Abhijeet Dalvi Says:
    March 26, 2012 at 10:54:00 AM GMT+5:30

    सुंदर चित्रपट....भावनेची संवेदनशीलता अतिशय प्रभावी पद्धतीने मांडली गेली...दिलीप प्रभावळकरांचा अभिनय हृदयस्पर्शी

  2. Mangala Bhoir Says:
    March 26, 2012 at 10:54:00 AM GMT+5:30

    सुरी! खरच गं हे जिवन असच या निसर्गाच्या प्रमाणे निर-निराळ्या इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात उधळूणारे असें सुंदर आहे! त्याची मजा घ्यावी तितकी कमीच! हा चित्रपट आणि हे गाणे दोन्हीही माझ्या आवडीचे गं! तूही या जिवनाचे असें सुंदर रंगांचा आस्वाद घे! धन्यवाद!शुभदिन!

  3. Subhi Abhijeet Dalvi Says:
    March 26, 2012 at 10:55:00 AM GMT+5:30

    मी असा कसा हे गाणे अतिशय संवेदनशील आहे...अभी कधी हे पोस्त करतो ते बघू या ...मी जीवनाचा आस्वाद घेत असते....रंग शोधून जीवनात भरण्याचा माझा आटोकाट प्रयत्न नेहेमी असतो.....अनि राहील.

  4. Mangala Bhoir Says:
    March 26, 2012 at 10:58:00 AM GMT+5:30

    :)

  5. Subhi Abhijeet Dalvi ‎ Says:
    March 26, 2012 at 10:58:00 AM GMT+5:30

    :-))))))))))))))))))))

  6. मिलिंद पळसुले Says:
    March 26, 2012 at 10:58:00 AM GMT+5:30

    kharach Jivan Sunder Aahe

  7. स्वाती ठकार Says:
    March 26, 2012 at 10:59:00 AM GMT+5:30

    मस्त गाणे ...तुमच्या पन्नासाव्या मॅरेज अनिवर्सरीला हे जीवन सुंदर आहे हेच गाणे तुमच्या मुखी राहो या शुभेच्छा ☺☺☺

  8. Kanchan Manjrekar Says:
    March 26, 2012 at 10:59:00 AM GMT+5:30

    hey Subhi ani Abhi hya sundar jivancha purpur aanand luta.....

  9. A+S says:
    March 26, 2012 at 11:00:00 AM GMT+5:30

    लूट रहे हैं दिलो जान से !!!!!!

  10. DrAmita Kulkarni Purohit Says:
    March 26, 2012 at 11:00:00 AM GMT+5:30

    Wow..Great..and blessings to both of you Subi and Abhi....have a great life.....

Post a Comment