अर्धीच रात्र वेडी

_____________

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले, जाता सरून गेले
नाही हिशेब केले, येतील शाप कानी

आता न सांध्यतारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फूलदाणी
______________

गीत : विंदा करंदीकर
संगीत : यशवंत देव
स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर

4 Response to "अर्धीच रात्र वेडी"

  1. स्वाती ठकार Says:
    June 13, 2012 at 2:46:00 PM GMT+5:30

    awesome!☺☺☺

  2. Subhi Abhijeet Dalvi Says:
    June 13, 2012 at 3:46:00 PM GMT+5:30

    येता भरून आले, जाता सरून गेले
    नाही हिशेब केले, येतील शाप कानी....LOVELY LYRICS !!

  3. Swapna Rajesh Pimple Says:
    June 13, 2012 at 9:53:00 PM GMT+5:30

    kya bole ..................

  4. Mangala Bhoir Says:
    June 17, 2012 at 5:34:00 PM GMT+5:30

    अप्रतिम काव्य, भावपूर्ण सुमधुर गाणे ! शुभसंध्या! अभी-सुभी!

Post a Comment