________________
जेव्हा तुला मी पाहिले, वळुनी पुन्हा मी पाहिले
काही न आता आठवे, होतो कधी का भेटलो
पटता खुणा या वाद का, होतो कधी का भेटलो ?
या सागराने का कधी होते नदीला पाहिले ?
काही न आता आठवे, होतो कधी का भेटलो
पटता खुणा या वाद का, होतो कधी का भेटलो ?
या सागराने का कधी होते नदीला पाहिले ?
जाणी तुझे नच नाव मी, प्रीती अनामिक जन्मता
वारा विचारी का फुला, हा गंध आहे कोणता ?
तू ऐस कोणी कामिनी, मी स्वामिनी तुज मानिले !
होऊन एकच चालणे, या दोन वाटा संपती
उंचावते तेथे धरा, आभाळ येई खालती
हरतात दोघेही जिथे, कोणी कुणाला जिंकिले ?
______________
गीत - वसंत निनावे
संगीत - बाळ बर्वे
स्वर - तलत महमूद
वारा विचारी का फुला, हा गंध आहे कोणता ?
तू ऐस कोणी कामिनी, मी स्वामिनी तुज मानिले !
होऊन एकच चालणे, या दोन वाटा संपती
उंचावते तेथे धरा, आभाळ येई खालती
हरतात दोघेही जिथे, कोणी कुणाला जिंकिले ?
______________
गीत - वसंत निनावे
संगीत - बाळ बर्वे
स्वर - तलत महमूद
December 5, 2012 at 4:45:00 PM GMT+5:30
शुभ संध्या ,
December 5, 2012 at 5:05:00 PM GMT+5:30
उत्कृष्ट गीत. वसंत निनावे यांच्या शब्दात एक भास-
आभासाचे द्वंद्व. बाल कर्वे यांचे मधुर संगीत. विशेषत:
अंतऱ्याचा रूपक निराळे पण दाखवून जातो. आणि
गायक तलत महमूद यांचा काळजाला भिडणारा स्वर
गाण्याची गोडी अधिकच वाढवतो....
एक मनभावक गीत .....
(माझ नाव टॅग केल्याबद्दल धन्यवाद)
December 5, 2012 at 5:06:00 PM GMT+5:30
नंदू बाब.... तुमका गीत-संगीतांची आवड आनी त्या लागी तुमची भाषेची पकड, एक खास 'लज़ाकत' म्हाका नवी उमेद वाट्ता. अशी जिद्द आनी उमेद म्हजेर कायम आसू हिचं म्हजी इच्छा.
December 5, 2012 at 5:21:00 PM GMT+5:30
हा तुमचा नम्र पणा झाला. असाच लोभ असू द्या
December 5, 2012 at 8:53:00 PM GMT+5:30
खूपच सुंदर ..........शुभ संध्या !!
December 6, 2012 at 12:55:00 AM GMT+5:30
पण कोणी कुणाला जिंकिले ?
December 6, 2012 at 12:56:00 AM GMT+5:30
" उंचावते तेथे धरा, आभाळ येई खालती "
तिथे क्षितीज आहे आणि तो प्रीती बिंदू आहे ....
नदीचा सागर, फुलांचा गंध आणि संपलेल्या वाटा.
सारे त्यात सामावलेले आहे. ते जय पराजयाच्या
पलीकडे गेले आहे......
December 6, 2012 at 12:57:00 AM GMT+5:30
khup sundar! dhanyavad! shubharatri! :)))
December 6, 2012 at 7:56:00 PM GMT+5:30
अप्रतिम सुभी -अभी ..
December 6, 2012 at 7:58:00 PM GMT+5:30
शु सं
December 8, 2012 at 7:35:00 PM GMT+5:30
Sundar, ati sundar, shubh kaamnaayen,