_______________
आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे
या स्वरांच्या चांदण्याला गगन दे रसिका तुझे
अक्षरांच्या लोचनांतुन गगन जरि हे निथळले
मी तुझ्यासाठीच केवळ बहर माझे उधळले
कल्पनावेलीस माझ्या सुमन दे रसिका तुझे
मी जगाचे ओठ झालो, बोलतो आहे खरे
दु:खितांचे दु:ख माझ्या अक्षरांतुन पाझरे
आसवे बघण्या व्यथांची नयन दे रसिका तुझे
काळजामाजि फुलांच्या भावना ओथंबल्या
एवढ्यासाठीच रात्री तारका खोळंबल्या
आज कवितेच्या उषेला किरण दे रसिका तुझे
__________________
गीत - रमण रणदिवे
स्वर - सुरेश वाडकर
या स्वरांच्या चांदण्याला गगन दे रसिका तुझे
अक्षरांच्या लोचनांतुन गगन जरि हे निथळले
मी तुझ्यासाठीच केवळ बहर माझे उधळले
कल्पनावेलीस माझ्या सुमन दे रसिका तुझे
मी जगाचे ओठ झालो, बोलतो आहे खरे
दु:खितांचे दु:ख माझ्या अक्षरांतुन पाझरे
आसवे बघण्या व्यथांची नयन दे रसिका तुझे
काळजामाजि फुलांच्या भावना ओथंबल्या
एवढ्यासाठीच रात्री तारका खोळंबल्या
आज कवितेच्या उषेला किरण दे रसिका तुझे
__________________
गीत - रमण रणदिवे
स्वर - सुरेश वाडकर
December 25, 2012 at 5:56:00 PM GMT+5:30
अक्षर, शब्द, भाव, मग ताल-सूर, लय आणि रसिक.
सर्व ताळमेळ सुंदर आणि मग जीवन सुंदर पण सुंदर सुंदर
December 25, 2012 at 5:56:00 PM GMT+5:30
आणि हो !! सुरेश वाडकर यांच्या भाव पूर्ण आवाजामुळे अजूनच रंगत आली. अभी चे ग्राफिक्स मग काय रंगत संगत
December 25, 2012 at 5:57:00 PM GMT+5:30
अक्षरांच्या लोचनांतुन...... fantastic words!