पप्पा सांगा कुणाचे ?


_________________


ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला

पप्पा सांगा कुणाचे ? पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ? मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात
चिमणा-चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ झेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे !
______________________

गीत  -  शान्‍ता शेळके
संगीत -  सी. रामचंद्र
स्वर -  राणी वर्मा,  प्रमिला दातार,  अरुण सरनाईक
चित्रपट- घरकुल (१९७०)

7 Response to "पप्पा सांगा कुणाचे ?"

  1. Subhi Abhijeet Dalvi Says:
    March 30, 2013 at 4:04:00 PM GMT+5:30

    अरे हे गाणे लहानपणी ऐकून मज्जा यायची ....कल्पना असायची ती पप्पा मम्मी पर्यंत होते ....आता ते पिलांचा पापा घ्यावा .....................गाणे तेच पण जीवनाच्या स्टेज बदलत गेल्या.....सुंदर पेशकश

  2. Subhi Abhijeet Dalvi Says:
    March 30, 2013 at 5:34:00 PM GMT+5:30

    पप्पा खरे कुणाचे ?

  3. Gayatri Kothi Tamhankar Says:
    March 30, 2013 at 5:35:00 PM GMT+5:30

    Subhi Abhijeet Dalvi अश्या कविता--अशी सुबक चित्र ऐकायला आणि बघायला कित्ती बंर वाटतं न?? पण वास्तव किती वेगळं असतं हे ज्याचे त्यालाच ठाऊक''''''!! सुभी दी --हे मी माझे मत मांडलय हं !!!!

  4. Subhi Abhijeet Dalvi Says:
    March 30, 2013 at 10:39:00 PM GMT+5:30

    thanks Gayatri Di. He peshkash Abhi chi aahe...

  5. Vishakha Samir Mashankar Says:
    April 2, 2013 at 9:55:00 PM GMT+5:30

    Wahhhhh.....

  6. Joshi Sanjay Says:
    April 2, 2013 at 9:56:00 PM GMT+5:30

    nice song

  7. स्वाती ठकार Says:
    April 2, 2013 at 9:56:00 PM GMT+5:30

    मस्त

Post a Comment